महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आंदोलन
*🚩*महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई*🚩
ज. मो. अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली.....
विभागातर्फे शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई कार्यालय चेंबूर येथे जिल्हा अध्यक्ष श्री नरेंद्र शिंदे , दक्षिण मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालय येथे ज्युनियर कॉलेज युनिट मुंबई विभाग अध्यक्ष श्री विशाल बावा व दक्षिण मुंबई कार्याध्यक्ष श्री गोकुळ सिंग पाटील व पश्चिम मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालय जोगेश्वरी पूर्व येथे मुंबई पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री हितेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली *गुरुवार दि. 21 मार्च रोजी दुपारी 1.30* वाजता
🪄शिक्षकांच्या ड्रेस कोड विषयी निर्गमित शासन आदेश व
🪄नवीन संचमान्यता याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण जिल्हा अध्यक्ष व कार्यकारीणी, पदाधिकारी, ज्युनियर कॉलेज युनिट, अल्पसंख्याक युनिट व महिला आघाडी पदाधिकारी आपापल्या ठिकाणी 1 वाजता आंदोलना साठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
साहेबांच्या आदेशाने.
नितीन चौधरी
राज्य समन्वयक
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
भाऊसाहेब घाडगे ( प्रसिद्धीप्रमुख)
Comments
Post a Comment