आजची शिक्षण मंत्र्यांसोबतचे महत्त्वपूर्ण बैठक



 दिनांक: 4 जून 2025

स्थळ: मंत्रालय, मुंबई


आज दिनांक 4 जून रोजी मंत्रालयातील शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादास दानवे साहेब, आमदार ज. मो. अभ्यंकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री रणजितसिंह देओल, उपसचिव श्री तुषार महाजन, एससीईआरटीचे संचालक श्री राहुल रेखावार, तसेच शिक्षक आमदार व विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत शालेय शिक्षण विभागातील विविध गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. चर्चेतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे होते:


टप्प्यावरील अनुदानित शाळांना अनुदान मिळणे


मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन


संच मान्यतेचे निकष शिथिल करणे


9 वी व 10 वीमध्ये 40 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक मंजुरी


दिनांक 15 मार्च 2024 चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे


वस्ती शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या सेवांचा वरिष्ठ श्रेणी व निवृत्ती लाभासाठी विचार


समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी समितीच्या कार्याला गती


निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासंदर्भातील तक्रारींचे निवारण


1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या परंतु DCP/NPS खात्याची नोंद न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन कार्यपद्धती जाहीर करणे



या सर्व मुद्द्यांवर शालेय शिक्षण मंत्री नाम. दादाजी भुसे साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचे आश्वासन दिले.


उपस्थित मान्यवर:

शिक्षक आमदार सन्मा. ज्ञानेश्वर म्हात्रे, सन्मा. श्रीकांत देशपांडे, सन्मा. अडबोले, सन्मा. अमरीश पटेल यांच्यासह,

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनाचे राज्य कार्याध्यक्ष श्री जालिंदर सरोदे, राज्य सरचिटणीस श्री रमेश चौगुले, श्री प्रकाश शेळके, राज्य समन्वयक श्री नितीन चौधरी, मुंबई विभाग महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती मानसी चाळके, ज्युनियर कॉलेज युनिट अध्यक्ष श्री विशाल बावा, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती अनुश्री जोगळे, श्री मासरे हिराज व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

माहितीसाठी सादर,

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना

भाऊसाहेब घाडगे 

 प्रसिद्धीप्रमुख 

Comments

Popular posts from this blog

*वस्ती शाळेतील प्रलंबित विविध प्रश्न सोडवण्यासाठी ज. मो. अभ्यंकर यांची भेट....*

श्री.ज.मो.अभ्यंकर यांनी माननीय आयुक्त श्री.राजीव कुमार यांचे त्यांना पत्र पाठवून आभार मानले.